Free मध्ये Online पैसे कमवा – Online Paise Kase Kamvave

How to Earn Money Online in Marathi
आज कालच्या ऑनलाईन जगामध्ये प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या ऑनलाइन मार्गाने पैसे कमावण्यासाठी नक्कीच माहिती घेत असतो. परंतु, प्रत्येकालाच ऑनलाईन युगामध्ये वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म ने चांगल्या पद्धतीने अर्निंग होईल असे नाही.
सोबतच बऱ्याच जणांना वेगवेगळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म माहिती आहेत की, ज्या मधून चांगल्या पद्धतीने कमाई केली जाऊ शकते जी की एक सरकारी जॉबच्या बरोबर सुद्धा असू शकते.
परंतु काहीजण असे आहेत की ज्यांना अजूनही ऑनलाइन कमाई खरच केली जाऊ शकते, याच्यावर विश्वास नाही आणि सोबतच बऱ्याच जणांना माहिती आहे online earning केली जाते. परंतु असे प्लॅटफॉर्म कोणते ज्यामधून फ्री मध्ये अर्निंग केली जाऊ शकते याबद्दलची माहिती या पोस्टमध्ये आपण पूर्ण पाहणार आहोत तर नक्कीच पोस्ट शेवटपर्यंत वाचा.
Benefits of Earn Money Online
ऑनलाइन कमाई करण्याचे फायदे जर म्हटले तर ते खूप महत्त्वाचे आहेत. पहिला म्हणजे freedom, तुम्ही 24 तास तुमचा एक प्रकारे तो ऑनलाइन बिजनेसच झालेला असतो त्यामुळे तुम्ही कधीही 24 तासांमध्ये त्याला टाईम देऊ शकता. नोकरीमध्ये कसे असते की तुम्हाला ठराविक आठ तास तुमच्या जॉब साठी द्यावे लागतात. त्यासाठी तुम्ही तुमच्या पद्धतीने टाईम ठरवू शकत नाही परंतु ऑनलाईन युगामध्ये नक्कीच तुम्ही तुम्हाला जेव्हा टाईम असेल त्या वेळेत काम करू शकता.
सोबतच ऑनलाईन अर्निंग करताय म्हणजे नक्कीच तुम्ही ज्या पण प्लॅटफॉर्म मधून ऑनलाईन अर्निंग करत आहात त्यात नक्कीच तुमचे स्किल हे चांगले असणार त्यामुळे तुमचे मन सुद्धा कामांमध्ये रमते सोबतच अनलिमिटेड तुम्ही अर्निंग करू शकता आणि तुमचा कोणीही बॉस नसतो त्यामुळे नक्कीच या ठिकाणी तुम्ही स्वतः बॉस असता त्यामुळे तुम्हाला कोणाचे बंधन सुद्धा नसते.
How to Earn Money Online – Earn Money Online Without Any Investment
आत्तापर्यंत आपण पाहिले की ऑनलाईन अर्निंग कशी केली जाते आणि खरंच ऑनलाईन अर्निंग चे काय काय फायदे आपल्याला आहेत तर आता यापुढे आपण ऑनलाइन अर्निंग करण्याचे पाच असे प्लॅटफॉर्म पाहणार आहोत ज्याने तुम्ही एकही रुपया खर्च न करता चांगल्या पद्धतीने अर्निंग करू शकता तर नक्कीच पोस्ट पूर्ण वाचा
1) Become Affiliate Marketer
पहिला ऑनलाइन पैसे कमावण्याचा सोपा मार्ग म्हणजे Affiliate Marketing.
Affiliate मार्केटिंग मधून अर्निंग करण्यासाठी तुम्हाला जास्त वेगळी काही मेहनत घेण्याची गरज नसते. तर मित्रांनो तुम्हाला काय करायचे फक्त Amazon, Flipkart यासारख्या बऱ्याच वेबसाईट आहेत ज्या की affiliate commission देतात तर या वेबसाईट बद्दलची माहिती घ्या आणि त्यावर तुमचे affiliate अकाउंट बनवा.
त्यानंतर त्या वेबसाईटवर जे जे प्रॉडक्ट सेल केले जातात त्याची एक affiliate लिंक तुम्ही जनरेट करू शकता affiliate अकाउंट बनवल्यानंतर आणि त्यानंतर तुमच्या जर त्या लिंकच्या माध्यमातून जर लोकांनी ते प्रॉडक्ट विकत घेतले, तर त्यामागचे जे affiliate commission कंपनीने ठरवले आहे ते तुम्हाला मिळते अशा पद्धतीने तुम्ही affiliate marketing करून अर्निंग करू शकता.
2) Blogging
दुसरा ऑनलाइन कमाई करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ब्लॉगिंग. मित्रांनो तुम्ही जर एखाद्या गोष्टींमध्ये एक्सपर्ट असाल एखाद्या कामामध्ये जर तुम्ही चांगल्या पद्धतीने इन्फॉर्मेशन देऊ शकत असाल तर तुम्ही ती information एखाद्या नोटपॅडमध्ये लिहिता तर मित्रांनो तुम्हाला तसे न करता तुम्हाला ऑनलाईन गुगलवर वेबसाईट ब्लॉगर म्हणून त्यावर तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने blog बनवून, त्यावर तुमच्या भाषेमध्ये त्या गोष्टीबद्दल किंवा तुम्हाला जी माहिती आहे त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन लिहून तुम्ही तो पोस्ट ब्लॉगवर अपलोड करून त्यातून चांगल्या पद्धतीने अर्निंग करू शकता.
ब्लॉगिंग मध्ये तुम्हाला कमाई करण्यासाठी विशिष्ट असा criteria असतो जो की google adsense चा असतो तो complete केल्यानंतर तुम्ही जे पण ब्लॉग्स लिहिलेले आहेत त्यावर advertisement शो केली जाते आणि त्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन कमाई होते.
3) Become Instagram Influencer
मित्रांनो आज काल आपण ज्या पद्धतीने whatsapp वापरतो त्याच पद्धतीने नक्कीच इंस्टाग्राम वर सुद्धा वेळ देत असतो. तर instagram मधून सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने फ्री मध्ये ऑनलाईन कमाई करू शकतो एकही रुपया खर्च न करता.
तर मित्रांनो इंस्टाग्राम मधून ऑनलाईन अर्निंग करण्यासाठी नक्कीच तुमचे जे फॉलोवर्स आहे ते खूप महत्त्वाचे आहेत कारण की यावर तुम्हाला advertisement शो नाही केली जाणार तर तुमची audience किती आहे यावर तुमचे ऑनलाईन अर्निंग इंस्टाग्राम मधून डिपेंड राहील. तुम्ही जर चांगल्या पद्धतीने जर एखादे प्रॉडक्ट प्रमोट करू शकत असाल आणि तुमच्याकडे जर ऑडियन्स असेल तर कोणतीही कंपनी तुमच्या मार्फत त्यांचे प्रॉडक्ट प्रमोट करून घेईल आणि या माध्यमातून तुम्हाला नक्कीच ती कंपनी योग्य ती तुमची जी फीज असेल ती चार्ज करेल.
4) Earn Money Online From Facebook
मित्रांनो तुम्ही आजकाल बऱ्याचदा ऐकले असेल की youtube वर व्हिडिओ टाकल्याने आपल्याला अर्निंग होते. परंतु बऱ्याच जणांना हे अजूनही माहित नाही की त्याच पद्धतीने व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक वर सुद्धा टाकले तर नक्कीच तुम्हाला फेसबुकच्या माध्यमातून सुद्धा ऑनलाईन अर्निंग होते. तुमच्या फेसबुक पेजवर जे व्हिडिओज आहेत त्यांच्यावर ads दाखवून कमाई केली जाते.
तर फेसबुक मधून अर्निंग करण्याचा मार्ग आहे फेसबुक पेज यामध्ये तुम्हाला फेसबुक Page Monetization जो पण क्रायटेरिया आहे तो कम्प्लीट करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही फेसबुक पेज च्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने ऑनलाईन कमाई घरबसल्या करू शकता.
5) Become Freelancer
मित्रांनो महिन्याला तुम्ही फ्रीलान्सिंग मधून सुद्धा चांगल्या पद्धतीने कमाई करू शकता तर फ्रीलान्सिंग मित्रांनो बऱ्याच जणांना माहिती नाही आणि ज्यांना माहिती आहेत ते चांगल्या पद्धतीने महिन्याला अर्निंग करत सुद्धा आहेत ते सुद्धा घरबसल्या आणि नऊ ते पाच चा जॉब न करता.
मित्रांनो freelancing मधून अर्निंग करण्यासाठी तुम्हाला विशिष्ट अशा गोष्टींमध्ये, विशिष्ट अशा कामामध्ये skill असणे खूप महत्त्वाचे आहे. फ्रीलान्सिंग मध्ये अर्निंग करण्यासाठी तुम्हाला फ्रीलासिंगच्या काही वेबसाईट्स आहेत (upwork) तर तुम्ही इंटरनेटवर त्या वेबसाईट बद्दल माहिती पाहू शकता आणि त्या वेबसाईटवर तुम्ही तुमची पूर्ण माहिती सोबत स्किल्स ची माहिती टाकून तुम्हाला नक्कीच त्यावर ऑनलाईन काम मिळते आणि तुम्ही त्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने अर्निंग करू शकता.
मित्रांनो वरीलपैकी कोणत्याही एका ऑनलाइन माध्यमातून तुम्ही चांगल्या पद्धतीने महिन्याला घरबसल्या चांगली अर्निंग करू शकता. यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करण्याची गरज नाहीये. सोबतच मित्रांनो तुम्ही जर एखादा जॉब करत असाल तर त्या जॉब सोबतही वरीलपैकी कोणत्याही एका ऑनलाइन प्लॅटफॉर्म मधून तुम्ही कमाई करू शकता पार्ट टाइम मध्ये सुद्धा तर नक्कीच ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना सुद्धा नक्की शेअर करा.