भारताला एक लाख ड्रोन पायलटची गरज, दरवर्षी 6000 कोटी रुपयांच्या रोजगाराची संधी; अनुराग ठकूर यांचा दावा
हब बनवण्याचा मोदी सरकारचा निर्धार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला. ड्रोन क्षेत्रात दरवर्षी 6000 कोटी रुपयांच्या रोजगाराची शक्यता आहे.
तरुणांना योग्य कौशल्ये आणि प्रशिक्षण दिल्यास भारत जागतिक ड्रोन हब बनू शकतो, असा दावा केंद्रीय माहिती आणि प्रसारण, युवा व्यवहार, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला आहे.
त्यांनी म्हटलं की, आज तंत्रज्ञानामुळे जग पूर्णपणे बदलत आहे. कठीण समस्या तंत्रज्ञानामुळे क्षणात सोडवल्या जातात. आज संरक्षण,
आपत्ती व्यवस्थापन, कृषी, पर्यटन, चित्रपट आणि मनोरंजन या क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञान आवश्यक आहे. देशातील पहिल्या ड्रोन ट्रेनिंग, ई-लर्निंग प्लॅटफॉर्मचं उद्घाटनकेंद्रीय माहिती आणि
प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी चेन्नईमध्ये देशातील पहिल्या ड्रोन स्किलिंग आणि ट्रेनिंग व्हर्च्युअल ई-लर्निंग प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केलं. याशिवाय, ठाकूर यांनी
चेन्नईतील गरुडा एरोस्पेसच्या उत्पादन युनिटमध्ये पहिले 1000 नियोजित ड्रोन सेंटर ऑफ एक्सलन्स लाँच केले. तसेच गरुड एरोस्पेसच्या ड्रोन यात्रा 'ऑपरेशन 777' ला हिरवा झेंडा दाखवला.
या ड्रोन यात्रेचा उद्देश देशातील 77 जिल्ह्यांतील विविध कृषी उपयोगांसाठी ड्रोनच्या उपयुक्ततेबद्दल लोकांना प्रबोधन करणे हा आहे. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्यही केलं.