स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्याचे किती प्रकार आहेत?

फायनान्स क्षेत्रामध्ये स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्केट हे नाव आपल्याला मोठ्या प्रमाणावर ऐकायला मिळतच असते. सध्याच्या काळात भारतामध्ये सुद्धा शेअर मार्केटच्या दिशेने लोकांचा वाढता कल दिसून येत आहे.

शेअर मार्केटमध्ये आपण ट्रेडिंग करून इन्व्हेस्टमेंट म्हणजेच गुंतवणूक करून ,लाभांश म्हणजेच डिव्हीडंड मिळवून पैसे कमवू शकतो. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग चे सुद्धा अनेक प्रकार पडत असतात त्यापैकी काही खालील प्रमाणे –

  1. इंट्राडे ट्रेडिंग
  2. स्विंग ट्रेडिंग
  3. ऑप्शन ट्रेडिंग
  4. डिलिव्हरी ट्रेडिंग,इ.

इंट्राडे ट्रेडिंग मध्ये आपण दिवसाची ट्रेडिंग करत असतो म्हणजेच एका दिवसातच आपण शेअर्स विकत घेतो आणि त्याच घेतलेल्या दिवशीच आपण ते शेअर्स विकत असतो. इंट्राडे ट्रेडिंग मध्ये आपण एखाद्या कंपनीच्या शेअरची खरेदी सकाळी मार्केट उघडल्यावर ते करत असतो आणि त्याचे विक्री संध्याकाळी मार्केट बंद होण्याच्या आत करत असतो. आपला प्रॉफिट किंवा लॉस हा आपल्याला त्या एका दिवसातच बुक करावा लागतो.

एका दिवसापासून एक महिन्यापर्यंत ठेवलेल्या शेअर्सच्या व्यवहारालाच स्विंग ट्रेड असे म्हणतात. यामध्ये इंट्राडे ट्रेडिंग प्रमाणे त्याच संध्याकाळी शेअरची विक्री केली जात नाही. येथे तुम्ही शेअर्स खरेदी केल्यानंतर पुढच्या एक महिन्यापर्यंतच्या कालावधीत कधीही प्रॉफिट बुक करून शेअर्स विकू शकता.

ऑप्शन ट्रेड म्हणजे एक प्रकारचा विमा असतो. यामध्ये एका निश्चित तारखेला शेअर्स खरेदी किंवा विक्री करण्याचा व्यवहार करून त्या ऐवजी तुम्ही प्रेमियम भरू शकता. त्या निश्चित तारखेच्या दिवशी शेअरची खरेदी किंवा विक्री झाल्यानंतर तुम्ही भरलेल्या प्रीमियमचे रकमेपेक्षा अधिक मूल्य हाती आले तर नफा आणि कमी मूल्य हाती आले तर तोटा. ऑप्शन ट्रेड हा एक सुरक्षित पर्याय आहे.

डिलिव्हरी ट्रेडिंग मध्ये शेअरची पूर्ण किंमत देऊन शेअर्स आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये जमा केले जातात. यात सुद्धा दोन प्रकार पडतात ते म्हणजे — जर आपण हे घेतलेले शेअर्स वर्षभरापूर्वीच विकले तर त्याला शॉर्ट टर्म ट्रेडिंग म्हणतात. तसेच एक वर्ष पूर्ण ठेवून नंतर जेव्हा शेअर्स विकले जातात तेव्हा त्याला लॉंग टर्म ट्रेडिंग म्हटले जाते.

मी आशा करतो तुम्हाला माझे उत्तर नक्कीच आवडले असेल आणि समजण्यास सोपे गेले असेल अजून अशा प्रकारचे प्रश्न आपल्या मनात आले तर लगेच फायनान्स मराठीशी संवाद साधा आपल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला लवकरात लवकर मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल, धन्यवाद..!

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.