Youtube Shorts मधून पैसे कमवा – Youtube Shorts Madhun Online Paise Kase Kamvayche
How to Earn Money From Youtube Shorts in Marathi
प्रत्येक जण आजच्या ऑनलाईन युगामध्ये कोणत्या ना कोणत्या ऑनलाइन मार्गाने पैसे कमावण्यासाठी Internet वर माहिती शोधत असतो. तर मित्रांनो या पोस्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही youtube shorts च्या माध्यमातून कशा पद्धतीने ऑनलाइन कमाई करू शकता ते पण घरबसल्या आणि एकही रुपया खर्च न करता.
Youtube shorts मधून कमाई करण्यासाठी तुम्हाला सेपरेट वेळ काढण्याची गरज नाहीये. तुम्ही पार्ट टाइम मध्ये सुद्धा करू शकता आणि एक एंटरटेनमेंट म्हणून सुद्धा तुम्ही जर व्हिडिओज टाकले आणि ते जर लोकांना जर आवडत गेले तर नक्कीच तुम्ही स्वतःचा एक ब्रँड बनवून चांगल्या पद्धतीने youtube shorts वर काम करत राहिलात तर नक्कीच तुम्हाला youtube शॉर्ट मध्ये सक्सेस मिळेल. तुम्हाला नक्कीच चांगले सबस्क्राइबर मिळतील आणि जर तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येत गेले तर नक्कीच तुम्ही चांगल्या पद्धतीने ग्रो होऊन चांगली कमाई करू शकता.
मित्रांनो youtube शॉर्टच्या माध्यमातून तुम्हाला youtube चैनल जर ग्रो करायचा असेल तर नक्कीच तुम्हाला कन्सिस्टन्सी तुमच्या कामामध्ये ठेवावी लागेल. सोबतच तुम्ही जे कंटेंट देणार आहात त्यामध्ये कॉलिटी आणि क्वांटिटी दोघांनाही नक्कीच व्यवस्थित मेंटेन ठेवून काम करावे लागेल. पहिल्या दिवसामध्ये तुम्हाला सक्सेस नाही मिळणार. तुम्हाला यासाठी थोडासा नक्कीच टाईम द्यावा लागेल म्हणजेच वेळ द्यावा लागेल. Regular काम केल्यावर नक्कीच तुम्हाला growth दिसेल. ज्या वेळेस तुमच्या चैनल ची ग्रोथ होईल त्यावेळेस नक्कीच तुम्ही चांगला पद्धतीने कमाई करण्यास सुरुवात करा.
1) Affiliate Marketing
मित्रांनो youtube shorts मधून ऑनलाइन कमाई करण्याचा पहिला मार्ग म्हणजे अफिलिएट मार्केटिंग. मित्रांनो अफिलेट मार्केटिंग आजकाल आपण पाहतो बरेच youtuber आणि ब्लॉगर्स आपल्या जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे त्यामधून नेहमी करत असतात. तर तुम्हाला एक सोपा पर्याय आहे ऑनलाइन कमाई करण्याचा तो म्हणजे affiliate मार्केटिंग आहे, कारण की यासाठी तुम्हाला काही क्रायटेरिया नाहीये काही तुम्हाला असा विशिष्ट असे रूल्स फॉलो नाही करायचे की ज्याने तुम्हाला तो क्रायटेरिया कम्प्लीट केल्यावर तुम्हाला ऑनलाईन earning होईल. तर तुम्ही नक्कीच affiliate मार्केटिंग करून youtube shorts च्या माध्यमातून चांगली कमाई करू शकता.
2) Product Review
मित्रांनो youtube shorts मधून दुसरा ऑनलाइन कमाई करण्याचा मार्ग म्हणजे प्रॉडक्ट रिव्ह्यू. मित्रांनो जर तुम्ही youtube shorts मध्ये एखाद्या टॉपिक वर कंटिन्यू जर व्हिडिओ बनवत असाल आणि त्यावर जर चांगले व्ह्यूज येत असतील तर नक्कीच मित्रांनो तुम्ही एखाद्या कंपनीच्या प्रोडक्टचे रिव्ह्यू सुद्धा करू शकता. त्या बदल्यात कंपनी तुम्हाला नक्कीच तुमचे जे चार्जेस असतील ते सुद्धा तुम्हाला देईल आणि या माध्यमातून सुद्धा तुम्ही युट्युब शॉर्ट च्या माध्यमातून कमाई करू शकता.